न्यू लकी रेस्टोरेंट, अहमदाबाद : मेलेल्या लोकांच्या मध्ये चवीचा अनुभव
या रेस्टोरेंट चे मालक कृष्णन कुट्टी यांनी अशी पद्धत अवलंबली, जी कदाचित दुसरा कोणताही व्यावसायिक वापरणार नाही. त्यांनी ठरवले की ते एक असे रेस्टोरेंट तयार करतील, जे एखाद्या कब्रस्ताना सारखे असेल. एवढेच नव्हे, तर त्यांनी कबरी निवडल्या आणि त्यांच्याच मध्ये रेस्टोरेंट बनवले देखील. कृष्णन मानतात की या कबरी त्यांना 'गुड लक' देतात. आणि ते खरे देखील आहे, कारण इथे नेहमीच असणारी ग्राहकांची गर्दी बिनदिक्कत चहा आणि नाश्ता यांचा आस्वाद घेते.