तिहाड फूड कोर्ट, दिल्ली : जेल च्या आत एक लज्जतदार अनुभव
दिल्ली येथील तिहाड जेल दक्षिण आशियातील सर्वांत मोठे तुरुंग आहे. इथे कैद्यांना सेल्फ-मेड बनवण्याच्या प्रयत्नांची नेहमीच तारीफ होते. जेलच्या आवारात फूड कोर्ट बनवणे त्याचाच एक हिस्सा आहे. इथे शिक्षा भोगत असलेले गुन्हेगारच या फूड कोर्टचे वेटर आणि अन्य स्टाफ आहेत. इथल्या स्टाफच्या नम्र व्यवहाराने दिल्लीच्या रहिवाशांमध्ये हळू हळू हे रेस्टोरेंट आपले स्थान निर्माण करू लागले आहे.