कॉफिन टॉर्चर
याला कॉफीन छळ म्हटले जात असे. मध्ययुगात ही पद्धत फार प्रचलित होती. कदाचित तुम्ही एखाद्या हॉलीवूड चित्रपटात देखील अशा प्रकारची शिक्षा होताना पाहिली असेल. पिडीताला या पिंजऱ्यात अशा प्रकारे कैद केले जात असे की तो आपल्या जागेवरून तसूभर देखील हलू शकत नसे. त्यानंतर पिंजरा एखाद्या झाडाला टांगला जाई. अशा प्रकारची शिक्षा ईश्वरनिंदा केल्यासारख्या गंभीर अपराधासाठी करण्यात येई. पिडीताला एक तर नरभक्षक श्वापदे खाऊन टाकत असत किंवा तो पक्षांचे अन्न तरी बनत असे. तसेच, पाहणारे लोक पिडीताच्या यातना वाढाव्यात यासाठी त्याला दगड देखील मारत असत.