Get it on Google Play
Download on the App Store

इम्प्लीमेंट


१५ व्या शतकात व्लाद तृतीय वालाशिया चा राजकुमार होता. व्लाद याला ड्रैकुला नावाने देखील ओळखले जाते. कारण, तो अत्यंत निर्दय होता. अपराध सिद्ध झाल्यावर तो धारदार खांब आरोपीच्या शरीराच्या आरपार घुसवण्याचा हुकुम देत असे. खांब एवढा मोठा असायचा की तो पाहून कोणाच्याही जीवाचा थरकाप उडवा.
ज्या मनुष्याला ही शिक्षा होत असे, त्याला जबरदस्तीने धारदार पोल वर बसायला लावले जात असे. पोल सावकाश त्याचे शरीर चिरत जात असे. सामान्यतः शिक्षा झालेल्या मनुष्याला पोल वर अशा प्रकारे बसवण्यात येई की पोलचा टोकदार भाग शरीराला चिरत हनुवटीवर येऊन एकदा थांबेल आणि मग हळू हळू हनुवातीचे हाड फोदर पार जाईल. असे करण्याच्या मागचे कारण म्हणजे पिडीताला जास्तीत जास्त वेळ यातना सोसाव्या लागाव्यात. अशा प्रकारे पोल लावल्यानंतर तीन दिवसांपर्यंत असह्य यातना भोगून झाल्यावर शेवटी पिडीताचा मृत्यू होत असे.
असे म्हटले जाते की व्लाद याने आपल्या शासनकाळात २०,००० पासून ३,००,००० लोकांना ही शिक्षा दिली होती. व्लाद अशा प्रकारचा क्रूर मनुष्य होता की त्याला जेवण जेवताना हे सर्व बघायला आवडत असे. जरा विचार करा, त्यावेळी त्याचा क्रूरपणा आणि त्याच्यातील जनावर किती उफाळून आले असेल.