Get it on Google Play
Download on the App Store

नोटांवरील चित्र



प्रत्येक भारतीय नोटेवर कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा फोटो छापलेला असतो - जसे २० रुपयांच्या नोटेवर अंदमान बेटाचा फोटो आहे, तर १० रुपयांच्या नोटेवर हत्ती, गेंडा आणि सिंह छापलेला आहे, १०० रुपयांच्या नोटेवर डोंगर आणि ढगांचे चित्र आहे. याशिवाय ५०० रुपयांच्या नोटेवर स्वातंत्र्याच्या आंदोलनाशी निगडीत ११ मूर्तींचा फोटो छापलेला आहे.भारतीय नोटेवर तिची किंमत १५ भाषांमध्ये लिहिली जाते. भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा जो फोटो छापलेला असतो, तो फोटो तेव्हा काढण्यात आलेला होता, जेव्हा गांधी, तत्कालीन बर्मा आणि भारतात ब्रिटीश सेक्रेटरीच्या रुपात कार्यरत असलेल्या फ्रेडरिक लॉरेन्स याला कलकत्ता स्थित व्हाईसराय हाउस मध्ये भेटायला गेले होते. १९९६ मध्ये हा फोटो नोटांवर छापण्यास सुरुवात झाली. त्यापूर्वी नोटेवर अशोक स्तंभ छापला जात असे.

RBI ने, जानेवारी १९३८ मध्ये पहिल्यांदा ५ रुपयांची पेपर करन्सी छापली होती. ज्यावर किंग जॉर्ज - ६ चा फोटो होता.