Get it on Google Play
Download on the App Store

जेसलमेरचा किल्ला

http://www.jaisalgarh.com/system/images/dam-images-architecture-2015-03-must-see-walled-cities-must-see-walled-cities-09.jpg

राजस्थान मध्ये थार च्या वाळवंटाच्या मध्यभागी असलेले जेसलमेर एक असा वालुकामय प्रदेश आहे जिथे सोनेरी स्वप्नांची रोपे खूप बहरून येतात. हे क्षेत्र वाळवंटात सोनेरी मरीचिकेप्रमाणे आहे जिथे एकदा गेल्यानंतर पर्यटक पुन्हा पुन्हा येण्याचा मोह आवरू शकत नाहीत. जेसलमेरच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये इथला एक प्राचीन किल्ला सर्वांत खास आहे. हा किल्ला नगरच्या सामान्य भू-पातळीपासून जवळ जवळ १०० मीटर उंचावर आहे. इथे स्थापित समाध्यांच्या छतावरील बारीक नक्षीकाम पाहण्याजोगे आहे. एवढेच नव्हे, इथे पूर्व सम्राटांच्या नक्षीदार घोड्यावर सावर असलेल्या मूर्त्यांची जादूही काही औरच आहे. कधी जावे : जेसलमेरला जाण्यासाठी सर्वांत योग्य कालावधी ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत असतो. दरसाल जानेवारी - फेब्रुवारीमध्ये जेसलमेर मध्ये वाळवंटी उत्सव साजरा केला जातो. या दरम्यान उंटांची शर्यत, लोकसंगीत आणि नृत्य तसेच पपेट शो आयोजित करण्यात येतात.