फत्तेपुर सिकरी
आग्रा जिल्ह्यातील हे छोटेसे शहर आजही आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा टिकवून आहे. मोघल बादशाह अकबर याने हे शहर वसवले होते. या शहरात मोघल संस्कृती आणि कला यांची झलक पाहायला मिळते. एका दशकापेक्षा देखील जास्त काल फत्तेपूर सिकरी मोघलांची राजधानी होती.
इथली सर्वांत उंच इमारत बुलंद दरवाजा आहे आणि तिची उंची २८० फूट इतकी आहे. १६०२ मध्ये अकबराने गुजरात विजयाच्या आनंदाप्रीत्यर्थ याची निर्मिती केली होती. या व्यतिरिक्त जामा मशीद, शेख सलीम चिश्ती याची समाधी, दिवान-ए-आम, दिवान-ए-खास, पंचमहल, बिरबलाचा महाल इत्यादी इथल्या प्रमुख इमारती आहेत. फत्तेपूर सिकरी जाण्यासाठी आग्रा हा सर्वांत जवळचा विमानतळ आहे. इथून फत्तेपूर ४० किमी अंतरावर आहे. इथून जवळचा रेल्वे स्थानक फत्तेपूर सिकरी आहे.