Android app on Google Play

 

पुराना किला, दिल्ली

 

http://www.thehindu.com/multimedia/dynamic/00351/11_YT_delhi_GAK21VB_351285e.jpg

या किल्ल्याची निर्मिती १६ व्या शतकात सूर वंशाचा संस्थापक शेरशाह सुरी याने केली होती. १५३९-४० मध्ये शेरशाह सुरी याने मोघल बादशाह हुमायून याला पराभूत करून दिल्ली आणि आग्रा ताब्यात घेतला. १५४५ मध्येत्याच्या मृत्युनंतर हुमायून ने पुन्हा दिल्ली आणि आग्रावर अधिकार प्रस्थापित केला होता. शेरशाह सुरीने बनवलेली लाल दगडांची इमारत शेर मंडल हिला हुमायून ने आपले पुस्तकालय बनवले. हा किल्ला देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षून घेतोच, पण इतिहासकारांनाही आकर्षून घेतो. अलीकडेच पुरातत्व विभागाच्या एका अहवालात सांगण्यात आले आहे की ज्या ठिकाणी हा किल्ला बनला आहे, त्या ठिकाणी इंद्रप्रस्थ वसलेले होते. इंद्रप्रस्थाला पुराणांमध्ये महाभारतातील नगर मानले जाते. किल्ल्यात प्रवेशासाठी तीन दरवाजे आहेत - हुमायून दरवाजा, तलकी दरवाजा आणि बडा दरवाजा. सध्या तिथे एक बोट क्लब आहे जिथे नौकायनाचा अनाद लुटता येऊ शकतो. जवळच प्राणी संग्रहालय देखील आहे.