Get it on Google Play
Download on the App Store

चारमिनार, हैदराबाद

https://s-media-cache-ak0.pinimg.com/236x/86/a8/b8/86a8b845ee0de479ee373e78c439432d.jpg

हैदराबाद शहराची ओळख बनलेला चारमिनार इस्लामिक वास्तुकालेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. १५९१ मध्ये शहरातील प्लेगची साथ संपल्याच्या आनंदात महम्मद कुली कुतुबशाह द्वारे बनवण्यात आलेला वास्तुकलेचा एक उत्तम नमुना म्हणजे चारमिनार. शहराची ओळख बनलेला चारमिनार म्हणजे चार मिनारांनी मिळून बनलेली एक चौरसाकार प्रभावशाली इमारत आहे. त्याच्या आर्क मध्ये रोज रोषणाई केली जाते जे एक अविस्मरणीय नयनरम्य दृश्य बनते. विमान, रेल्वे, बस किंवा खाजगी गाड्यांनी हैदराबादला जाता येते. चारमिनार रेल्वे स्थानकापासून साधारण ७ किमी अंतरावर आहे. बस स्थानकापासून साधारण ५ किमी अंतरावर आहे. खाजगी वाहनांनी देखील इथे सहज जाता येऊ शकते.