सांची स्तूप
मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळ आणि विदिशा यांच्या मध्ये वसलेला सांची स्तूप जगभरातील भ्रमंती करणाऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने हा सांची स्तूप बनवला होता. हा स्तूप शांती, आस्था, साहस आणि प्रेम यांचे प्रतीक आहे. बौद्ध धर्माची शिकवण जनामानसापर्यंत पोचवण्यासाठी सम्राट अशोकाने हा स्तूप बनवला होता. दीर्घ काळ दुर्लक्षित राहिलेला सांची स्तूप आज केवळ जगभरात प्रसिद्ध झाला आहे एवढेच नव्हे तर आपल्या ऐतिहासिक महत्त्वामुळे युनेस्कोच्या जगाच्या वारशांच्या यादीत देखील समाविष्ट आहे. सांचीला जाण्यासाठी विमान, रेल्वे, बस इत्यादी माध्यमातून आरामात प्रस्थान करता येऊ शकते.