म्हैसूर पैलेस
महाराजा पैलेस, राजमहाल म्हैसूरच्या कृष्णराजा वाडियार चतुर्थ यांचा आहे. यापूर्वीचा राजमहाल चंदनाच्या लाकडापासून बनलेला होता. एका दुर्घटनेत त्या महालाचे प्रचंड नुकसान झाले ज्यानंतर हा दुसरा महाल बनवण्यात आला. म्हैसूर पैलेस द्रविड, पौर्वात्य आणि रोमन स्थापत्य कलेचा अद्भुत संगम आहे. काळजीपूर्वक आणि नाजुकतेने घासलेल्या ग्रेनाईट दगडांनी बनलेला हा महाल गुलाबी दगडांच्या घुमटांनी सजलेला आहे. महालात एक मोठा दुर्ग आहे ज्याचे घुमट सोन्याच्या दगडांनी सजवलेले आहेत. सूर्यप्रकाशात ते खूप चमकतात. इतर महालांप्रमाणेच इथेही राजांसाठी दीवान-ए-खास आणि आम लोकांसाठी दीवान-ए-आम आहे. ओठे अनेक कक्ष आहेत ज्यामध्ये चित्र आणि राजेशाही हत्यारे ठेवण्यात आली आहेत. राजेशाही पोशाख, आभूषणे, महोगनी वृक्षाच्या लाकडाचे बारीक नक्षीकाम केलेले भलेमोठे दरवाजे आणि छतांना लागलेले झाड-फानूस महालाची शोभा वाढवतात. हा महाल सकाळी १० ते संध्याकाळी ४.३० पर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो. संध्याकाळच्या वेळी रोषणाईने न्हालेल्या म्हैसूर पैलेस ची शोभा काही औरच असते. हा पैलेस आता संग्रहालयात बदलला आहे.