Android app on Google Play

 

आमेर महाल, जयपुर

 

http://www.indialine.com/travel/images/amber-palace-jaipur.jpg

जयपूरच्या प्रमुख ऐतिहासिक स्थळांमध्ये सामील आहे आमेर चा शानदार महाल. अरावलीच्या मध्यम उंच भागात वसलेल्या आमेर महालाची निर्मिती सोळाव्या शतकात झाली होती. हा महाल पाहूनच त्या काळातील उत्कृष्ट मोघल आणि राजपूत निर्माण शैलीचा अंदाज करता येऊ शकतो. या भव्य महालाची तुलना जगातील शानदार महालांशी केली जाते. आमेर महालात विशाल जलेब चौक, शिला माता मंदिर, दीवाने आम, गणेश पोल, शीश महल, सुख मंदिर, मुगल गार्डन, राण्यांचे महाल इत्यादी सर्व पाहण्यासारखे आहे. शीश महल मधील काचेच्या नक्षीची जादू काही अशी आहे की मुगले आजम पासून जोधा अकबर पर्यंत सर्व बॉलीवूड चित्रपटांमध्ये त्याने आपला ठसा उमटवला आहे. अलीकडेच आमेर महालापासून जयगड जाण्यासाठी एक जुना बोगदा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. जयगड किल्ल्यावर ठेवलेली जयबाण तोफ आशियातील विशाल तोफांपैकी एक आहे.