Android app on Google Play

 

जलमहाल, जयपुर

 

http://www.yohyoh.com/blueimp/server/php/files/f8c53050daad23ec86092bc46b2e823d97ed865.jpeg

जलमहाल पाण्यावर तरंगणाऱ्या सुरेख शिकाऱ्यासारखा दिसणारे एक शानदार ऐतिहासिक स्थान आहे. जयपूर शहरापासून साधारण ८ किमी अंतरावर आमेर मार्गावर जलमहाल स्थित आहे. मानसागर तलावाच्या मध्ये असलेल्या या महालाचे सौंदर्य लाजवाब आहे. आमेर मध्ये असलेल्या पाणीटंचाईमुळे याची निर्मिती करण्यात आली होती. जयपूरचे राजेमहाराजे इथे निवांत वेळ घालवण्यासाठी येत. सध्या हे पर्यटनाचे एक प्रमुख केंद्र आहे. तिथे जाण्यासाठी शहरातून सिटीबस उपलब्ध आहेत. खाजगी वाहनांनी देखील तिथे जाता येऊ शकते. महालाच्या आत जाण्यासाठी नौका उपलब्ध असतात.