Android app on Google Play

 

विराध

 

http://2.bp.blogspot.com/-vOin_kXtlf8/VUESBHzYkZI/AAAAAAAASIQ/cdQoNDplmoU/s1600/ar%2Bkanda1.jpg

विराध दंडक वनातील राक्षस होता. रामाने सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत दंडक वनात प्रवेश केला. तिथे त्यांना ऋषी मुनींचे अनेक आश्रम दिसले. राम त्यांच्याच आश्रमात राहू लागला. ऋषींनी त्याला एका राक्षसाच्या उपद्रवाची माहिती दिली. रामाने त्यांना अभय दिले. तिथून त्याने महावनात प्रवेश केला जिथे अनेक प्रकारचे हिंस्र पशु आणि नरभक्षक राक्षस राहत होते. हे नरभक्षक राक्षसच ऋषी मुनींना सतावत असत. काही अंतर गेल्यावरच एक वाघाचे कातडे पांघरलेला पर्वताकार दैत्य दिसला. त्या राक्षसाने हत्तीप्रमाणे चित्कारत सीतेवर झडप घातली. त्याने सीतेला उचलले आणि काही अंतरावर जाऊन उभा राहिला. त्याने चिडून राम आणि लक्ष्मणाला विचारले - धनुष्य बाण घेऊन तुम्ही दंडक वनात घुसला आहात, तुम्ही दोघे कोण आहात? तुम्ही माझे नाव ऐकले नाही का? मी दररोज ऋषींचे मांस खाऊन भूक भागवणारा विराध आहे. तुमचा मृत्यू तुम्हाला इथे घेऊन आला आहे. मी तुमच्या दोघांचे रक्त पिऊन या सुंदर स्त्रीला माझी पत्नी बनवणार आहे. तो हसत हसत म्हणाला - जर तुम्हाला माझी ओळख नसेल तर ऐका - मी जय राक्षसाचा पुत्र आहे. माझ्या मातेचे नाव शतह्रदा आहे. मला ब्रम्हदेवाकडून असे वरदान प्राप्त आहे की मला कोणत्याही प्रकारचे अस्त्र - शस्त्र मारू शकत नाही आणि कोणत्याची शस्त्राने माझे शरीर छिन्न विच्छिन्न होऊ शकत नाही. जर तुम्ही या स्त्रीला माझ्यापाशी सोडून निघून गेलात तर मी तुम्हाला वचन देतो की मी तुम्हाला मारणार नाही. राम आणि लक्ष्मणाने त्याला प्रत्येक प्रकारे जखमी केले. त्याचे दोन्ही हात कापले. तेव्हा राम म्हणाला, लक्ष्मण, वरदानामुळे हा दुष्ट मरू शकत नाही तेव्हा हेच योग्य होईल की आपण जमिनीत खड्डा खणून याला खूप खोल पुरून टाकूया. लक्ष्मण खड्डा खोदू लागला आणि राम विराधच्या मानेवर पाय रोवून उभा राहिला. तेव्हा विराध म्हणाला, प्रभू, मी तुम्बुरू नावाचा गंधर्व आहे. कुबेराने मला राक्षस होण्याचा शाप दिला होता. त्यामुळे मी राक्षस झालो होतो. आज तुमच्या कृपेने मला त्या शापातून मुक्ती मिळत आहे. राम आणि लक्ष्मण यांनी त्याला खड्ड्यात टाकले आणि माती दगड आदींनी तो खड्डा बुजवून टाकला.