सुबाहु
ताडकाच्या वडिलांचे नाव सुकेतू यक्ष आणि पतीचे नाव सुन्द होते. सुन्द एक राक्षस होता त्यामुळे यक्ष असूनही तडका राक्षसीण म्हणवली गेली. अगस्त्य मुनींच्या शापामुळे तिचा सुंदर चेहरा कुरूप झाला होता त्यामुळे तिने ऋषींचा बदला घेण्याचे ठरवले होते. ती रोज आपल्या पुत्रांसोबत मुनींना त्रास देत राहायची. ती अयोध्येनजिक एका सुंदर वनात आपले पती आणि दोन पुत्र सुबाहू आणि मारीच यांच्यासोबत राहत होती. ताडकाच्या शरीरात हजार हत्तींचे बळ होते. त्यामुळेच सुंदर वनाला आधी ताडक वन म्हटले जाई. सुबाहू देखील भयंकर होता आणि तो रोज ऋषींच्या यज्ञात उत्पात माजवत असे. त्याच वनात विश्वामित्रांसहित अनेक ऋषी-मुनी तपश्चर्या करत असत. हे सर्व राक्षसगण नेहमी त्यांच्या तपश्चर्येत व्यत्यय आणत असत. एका यज्ञाच्या दरम्यान विश्वामित्रांनी राजा दशरथाला अनुरोध करून एक दिवस राम आणि लक्ष्मण यांना आपल्या सोबत सुंदर वनात घेऊन आले. रामाने ताडका आणि विश्वामित्रांच्या यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या दिवशी सुबाहुचा वध केला. रामाच्या बाणाने जखमी होऊन मारीच दूर दक्षिणेला समुद्र किनाऱ्यावर जाऊन पडला.