Android app on Google Play

 

राक्षसराज रावण

 

http://i9.dainikbhaskar.com/thumbnail/600x519/web2images/www.bhaskar.com/2015/10/15/ravan_1444849874.jpg

मालीची कन्या कैकसी रावणाची माता होती. रावणाचा आपल्या आजोबांकडे जास्त ओढा होता त्यामुळे त्याने देव सोडून राक्षसांच्या उन्नतीविषयी जास्त विचार केला. रावण एक कुशल राजकारणी, सेनापती आणि वास्तुकला जाणकार असण्यासोबतच अनेक विद्यांचा जाणकार होता. राक्षस प्रजातीबाद्द्ल त्याला असलेली आस्था पाहून त्याला राक्षस प्रजातीचा मुख्य म्हणून घोषित करण्यात आले होते. रावणाने लंकेला नवीन पद्धतीने वसवले आणि सर्व राक्षस प्रजातीला एकजूट करून पुन्हा राक्षस राज्य कायम केले. त्याने कुबेराकडून लंका मिळवली होती. त्याला मायावी म्हणत असत कारण त्याला इंद्रजाल, तंत्र, संमोहन आणि अनेक प्रकारच्या जादू येत होत्या. त्याच्याजवळ असे विमान होते जे अन्य कोणा जवळही नव्हते. या सर्वामुळे सर्वजण त्याला घाबरत असत. एका मान्यतेनुसार शापाच्या प्रभावाने विष्णूचे सेवक जय आणि विजय यांनीच रावण आणि कुंभकर्णाच्या रुपात जन्म घेऊन धरतीवर आपले साम्राज्य प्रस्थापित केल होते. द्वापार युगात हेच दोघे शिशुपाल आणि दंतवक्त्र नावाच्या अत्याचारी पुरुषांच्या रुपात जन्माला आले होते. त्यांना ३ जन्मांची शिक्षा होती. रावणाने रक्ष संस्कृतीचा विस्तार केला होता. त्याने कुबेराकारून लंका आणि त्याचे विमान हस्तगत केले. रावणाने रामाची पत्नी सीता हिचे अपहरण केले आणि अभिमानी रावणाने शंकराचा अपमान देखील केला होता. विद्वान असण्या सोबतच रावण क्रूर, दांभिक आणि अत्याचारी होता.