कबंध
सीतेच्या शोधात फिरणाऱ्या राम - लक्ष्मणाला दंडक वनात एक विचित्र दानव दिसला ज्याचे मस्तक आणि गळा नव्हता. त्याचा केवळ एकाच डोळा दिसत होता. तो विशालकाय आणि भयानक होता. त्या विचित्र दैत्याचे नाव कबंध होते. कबंधाने राम आणि लक्ष्मणाला एकाच वेळी पकडले. राम आणि लक्ष्मणाने त्याचे दोन्ही हात कापून टाकले. कबंध भूमीवर पडला आणि त्याने विचारले - तुम्ही कोण आहात? त्यांनी परिचय दिल्यावर कबंध म्हणाला - हे माझे भाग्य आहे की तुम्ही मला बंधनातून मुक्त केलेत. तो पुढे म्हणाला - मी दनु चा पुत्र कबंध खूप पराक्रमी आणि सुंदर होतो. राक्षसांचे भीषण रूप घेऊन मी ऋषींना घाबरवत असे म्हणून माझी अशी अवस्था झाली होती.