कुंभकर्ण
हा रावणाचा भाऊ होता जो ६ महिन्यांनंतर एकदा एक दिवसासाठी जागा होत असे आणि भोजन करून पुन्हा झोपी जाई, कारण त्याने ब्रम्हदेवाकडून निद्रासनाचे वरदान मागून घेतले होते. युद्धाच्या वेळी कसे तरी करून त्याला जागे करण्यात आले. कुंभकर्णाने युद्धात आपल्या विशालकाय शरीराने वनरांवर हल्ला सुरु केला ज्यामुळे रामाच्या सैन्यात हाहाःकार मजला. सेनेचे मनोबल वाढवण्यासाठी रामाने कुंभकर्णाला युद्धासाठी ललकारले आणि प्रभू श्रीरामाच्या हातून कुंभकर्णाला वीरगती प्राप्त झाली.