Get it on Google Play
Download on the App Store

अणू सिद्धांताचे जनक

अणुबॉम्ब आज सर्वांनाच माहिती आहे. तो किती महाभयंकर धोकादायक आहे हे देखील सर्वांनाच माहिती आहे. आधुनिक काळात या बॉम्बचे जनक आहेत जे. रॉबर्ट ओपनहाइमर. रॉबर्टच्या नेतृत्वाखाली १९३९ ते १९४५ कित्येक वैज्ञानिकांनी काम केले आणि १६ जुलै १९४५ रोजी याचे पहिले परीक्षण करण्यात आले.

http://firstip.org/wp-content/uploads/2013/06/kanada.gif
खरे तर अणू सिद्धांत आणि अस्त्र यांचा जनक जॉन डाल्टन याला मानले जाते, परंतु त्याच्या देखील २५०० वर्षे आधी ऋषी कणाद यांनी वेदांमध्ये लिहिलेल्या सूत्रांच्या आधारे अणू सिद्धांताच्या बाबतीत माहिती दिली होती. भारतीय इतिहासात ऋषी कणाद यांना आण्विक शास्त्राचे जनक मानले जाते. कणाद प्रभास तीर्थामध्ये राहत होते.

विख्यात इतिहास तज्ञ टिएन कोलेब्रूक याने लिहिले आहे की आण्विक शास्त्रात आचार्य कणाद आणि अन्य भारतीय शास्त्रज्ञ युरोपीय वैज्ञानिकांपेक्षा जास्त निष्णात होते.