Android app on Google Play

 

विमान

 

इतिहासाची पुस्तके आणि शालेय अभ्यासक्रमात असे शिकवले जाते की विमानाचा शोध 'राईट बंधू'नी लावला, परंतु हे चूक आहे. हां, हे खरे आहे की आजच्या आधुनिक युगात आधुनिक विमानाची सुरुवात ओरविल आणि विल्बुर राइट या बंधूंनी १९०३ मध्ये केली होती. परंतु याच्या हजारो वर्षे पूर्वी ऋषी भारद्वाज यांनी विमानशास्त्र लिहिले होते ज्यामध्ये विमान बनवण्याच्या तंत्राचे स्पष्ट वर्णन मिळते.
इ.स.पू. ४ थ्या शतकात महर्षी भारद्वाजांनी लिहिलेल्या "वैमानिक शास्त्र" मध्ये एक उडणारे यंत्र 'विमान' च्या बाबतीत अनेक प्रकारचे वर्णन करण्यात आलेले आहे आणि हवाई युद्द्धाचे कित्येक नियम आणि प्रकार सांगण्यात आलेले आहेत..

http://www.caravanmagazine.in/wp-content/uploads/files/vimana-vimanam-vimanas-carruagens-de-fogo-1_1_0.jpg

'गोधा' असे विमान होते, जे अदृश्य होऊ शकत होते. 'परोक्ष' शत्रूचे विमान निकामी करू शकत होते. 'प्रलय' एक प्रकारचे विद्युत उर्जेचे शस्त्र होते ज्यामध्ये विमान चालक भयंकर विध्वंस करू शकत होता. 'जलद रूप' एक असे विमान होते जे ढगांसारखे दिसत असे.

स्कंद पुराण खंड ३ अध्याय २३ मध्ये उल्लेख मिळतो की ऋषी कर्दम यांनी आपल्या पत्नीसाठी एका अशा वस्तूची निर्मिती केली होती जिच्यामधून कुठेही जाता येता येत होते. रामायणात देखील पुष्पक विमानाचा उल्लेख मिळतो ज्यामध्ये बसून रावण सीतेला अपहरण करून घेऊन गेला.