Android app on Google Play

 

शल्य चिकित्सा (शस्त्रक्रिया), प्लास्टिक सर्जरी

 

प्लास्टिक सर्जरीच्या आविष्काराने विश्वात क्रांती आणली. पश्चिमी लोकांच्या मते प्लास्टिक सर्जरी आधुनिक विज्ञानाची देणगी आहे. प्लास्टिक सर्जरीचा अर्थ आहे - "शरीराच्या एखाद्या भागाला बरे करणे". भारतात सुश्रुत यांना पहिले शल्य चिकित्सक मानले जाते. आजपासून जवळ जवळ २६०० वर्षांपूर्वी सुश्रुत युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे ज्यांचे अंग भंग (मोडतोड) झाले असेल, किंवा नाक खराब झाले असेल, तर ते ठीक करण्याचे काम करत असत.

http://3.bp.blogspot.com/-r-xDIjHzZ9Q/VjLY1Di_JsI/AAAAAAAAANM/N1MbFN387Bw/s1600/Slids%2BBAMS%2BBlog%2B2.jpg

सुश्रुतने इ.स.पू. १००० मध्ये आपल्या काळात स्वास्थ्य वैज्ञानिकांसोबत प्रसूती, मोतीबिंदू, कृत्रिम अवयव लावणे, मोडलेली हाडे जुळवणे, आन्त्रपुच्छाचा इलाज आणि प्लास्टिक सर्जरी सारख्या कित्येक प्रकारच्या किचकट आणि अवघड शस्त्रक्रियांचे सिद्धांत प्रतिपादित केले होते. अर्थात काही लोक सुश्रुतचा काल इ.स.पू. ८०० मानतात. सुश्रुतपूर्वी धन्वंतरी होऊन गेले.

सुश्रुतला मेंदूची शस्त्रक्रिया आणि प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी ओळखले जाते. त्यांनी आपल्या सहकार्यांसोबत मिळून ३००० पेक्षाही जास्त शस्त्रक्रिया केल्या होत्या. आधुनिक वैद्यकीय विज्ञान केवळ ४०० वर्षांपूर्वीच शस्त्रक्रिया करू लागले आहे, परंतु सुश्रुतने २६०० वर्षांपूर्वी हे कार्य करून दाखवले आहे. सुश्रुतपाशी आपली स्वतःची बनवलेली उपकरणे होती ज्यांना उकळून ते त्यांचा वापर करत असत. महर्षी सुश्रुत द्वारे लिहिलेल्या "सुश्रुत संहिता" या ग्रंथात शास्त्राक्रीयेशी संबंधित सर्व महत्वपूर्ण माहिती मिळते. या ग्रंथात चाकू, सुई, चिमटे इत्यादींसह १२५ पेक्षा देखील जास्त शास्त्राक्रीयेसाठी आवश्यक उपकरणांची नवे मिळतात आणि या ग्रंथात जवळ जवळ ३०० प्रकारच्या शस्त्रक्रियांचा उल्लेख मिळतो.