Get it on Google Play
Download on the App Store

शून्याचा शोध

शून्य नसते तर आधुनिक विकास देखील झाला नसता. शून्य च्या आधी जगभरात कित्येक प्रकारच्या अंक प्रणाली विकसित होत्या. उत्तर वैदिक काळात (इ.स.पू. १००० ते ५००) शून्याच्या अविष्कारानंतरच गणितात एक बलाढ्य क्रांती आली.

अंकांच्या बाबतीत विश्व भारताचे ऋणी आहे. भारताने अंकांच्या व्यतिरिक्त शून्याचा शोध लावला. बीज गणित, त्रिकोणमिती आणि कलन चा शोध भारतातच लागला होता. स्थान मूल्य प्रणाली आणि दशमान पद्धतींचा विकास देखील भारतातच झाला.

http://mathground.net/wp-content/uploads/2013/12/2.jpeg

२५०० वर्ष जुन्या उपलब्ध संस्कृत दस्तऐवजांमध्ये भारतीयांकडून गणिताच्या क्षेत्रात करण्यात आलेल्या आविष्कारांच्या समृद्ध परंपरेचे विवरण मिळते. प्रारंभिक वैदिक काळात संख्यांची दशमान पद्धती आणि अंकगणित तसेच रेखागणित यांचे नियम विकसित झालेले होते. त्यांना मंत्र, स्तोत्र, स्तुती, श्राप, श्लोक, ऋचा, आणि अन्य धार्मिक अनुष्ठानांच्या एका अवघड पद्धतीमध्ये लिपीबद्ध करण्यात आले होते. मंदिरांची निर्मिती आणि यज्ञ वेद्यांची रचना यांचे नियम बनवलेले होते आणि त्यांना सूत्रांच्या रुपात बद्ध करण्यात आले होते.
उत्तर वैदिक काळात रेखा गणिताच्या सूत्रांचा विकास झाला जो शुल्व सूत्रांच्या रूपाने उपलब्ध आहे.
एका कथेनुसार भगवान बुद्धाने आपल्या होणाऱ्या पत्नीचे मन जिंकण्यासाठी आकड्यांच्या मोठमोठ्या शृंखला आपल्या स्मरणशक्तीच्या आधारावर ऐकवल्या होत्या. बौद्धकाळात जग आपल्या ज्ञानाच्या अत्युच्च स्थानी होते.

गुप्तकाळाचा मुख्य अविष्कार शून्य नव्हे, तर 'शून्य युक्त दशांश संख्या प्रणाली' आहे. गुप्तकाळाला भारताचा सुवर्णकाळ म्हटले जाते. या युगात ज्योतिष, वास्तू, स्थापत्य आणि गणित यांचे कित्येक नवे नमुने स्थापन केले गेले. या काळातील भव्य इमारतींवर गणिताच्या अन्य अंकांसहित शून्य देखील अंकित केलेले आहे.

आर्यभट्ट (जन्म इस ४७६) ला शून्याचा अविष्कारक मानता येणार नाही. आर्यभट्टने एका नवीन वर्णांक पद्धतीचा अविष्कार केला होता. याव्यतिरिक्त गुप्तकाळातच ब्रह्मगुप्त, श्रीधराचार्य, महावीराचार्य इत्यादी श्रेष्ठ गणितज्ञ झाले ज्यांच्या मुळे भारतीय गणिताचा विश्वात नव्याने प्रचार आणि प्रसार झाला.