Android app on Google Play

 

भूमिका

 

धर्म, दर्शन, विज्ञान, वास्तु, ज्योतिष, खगोल, स्थापत्य कला, नृत्य कला, संगीत कला या सर्वांप्रमाणे ज्ञानाचा देखील जन्म भारतातच झाला आहे असे म्हटले तर ते चूक ठरणार नाही, कारण या गोष्टीचे हजारोनी पुरावे आहेत. मध्यकाळात भारतीय गौरव नष्ट करण्यात आला होता आणि आजचा तथाकथित भारतीय पाश्चिमात्य संस्कृतीलाच महान समजतो.
भारतामध्ये प्राचीन काळापासूनच ज्ञानाला अतिशय महत्व देण्यात आलेले आहे. कला, विज्ञान, गणित आणि अशी असंख्य क्षेत्र आहेत ज्यांच्यामध्ये भारताचे योगदान अद्वितीय आहे. आधुनिक युगातील असे असंख्य अविष्कार आहेत, जे भारतीय संशोधनाच्या निष्कर्षांवरच आधारित आहेत. आता माहिती करून घेऊयात कोणकोणते आहेत हे शोध, जी भारतीयांची देणगी आहे -