रेडियो
इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सांगितले जाते की रेडियोचा अविष्कार जी. मार्कोनी याने केला होता, परंतु प्रत्यक्षात तसे नाहीये. इंग्रज काळात मार्कोनीला भारतीय शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांच्या लाल डायरी मधील नोंदी मिळाल्या ज्यांच्या आधारे त्याने रेडियोचा अविष्कार केला.
मार्कोनीला १९०९ मध्ये वायरलेस टेलीग्राफी साठी नोबेल पुरस्कार मिळाला. परंतु रेडियो लहरींचे पहिले सार्वजनिक प्रदर्शन, मिलीमीटर तरंग आणि क्रेस्कोग्राफ सिद्धांताचे जनक जगदीश चंद्र बोस होते ज्यांनी १८९५ मध्येच हा शोध लावला होता.
यानंतर २ वर्षांतच मार्कोनीने प्रदर्शन केले आणि सर्व श्रेय लाटले. भारत त्यावेळी एक गुलाम देश होता त्यामुळे जगदीश चंद्र बोस यांना फारसे महत्व दिले गेले नाही. त्यातच ते आपल्या शोधाचे पेटंट करून घेण्यात अयशस्वी झाले ज्यामुळे मार्कोनीलाच रेडियोचा जनक मानले जाऊ लागले. संचारच्या विश्वात रेडियोचा अविष्कार सर्वांत मोठी सफलता आहे.