Android app on Google Play

 

पाय च्या मूल्याची गणना

 

http://core0.staticworld.net/images/article/2013/03/pi-100029039-large.png

बौधायन भारताचे प्राचीन गणितज्ञ होते. पायथागोरसच्या सिद्धांतापूर्वीच बौधायननि भूमितीची सूत्र रचली होती परंतु आज जगात भूमितीशास्त्री पायथागोरस आणि युक्लिड यांचे सिद्धांतच शिकवले जातात. प्रत्यक्षात २८०० वर्ष (इ.स.पू.८००) बौधायनने रेखागणित आणि भूमितीच्या महत्वपूर्ण नियमांचा शोध लावला होता. त्या काळात भारतात भूमिती, रेखागणित आणि त्रिकोणमितीला शुल्व शास्त्र म्हटले जात असे.

शुल्व शास्त्राच्या आधारे विविध आकार-प्रकारचे नियम बनवले जात. दोन काटकोन समभूज चौकोनांच्या क्षेत्रफळांची बेरीज केल्यानंतर जी संख्या येईल तेवढ्या क्षेत्रफळाचा काटकोन समभुज चौकोन काढणे आणि त्या आकृतीचे त्याच्या समान क्षेत्रफळाच्या वर्तुळात परिवर्तन करणे, अशा प्रकारचे अनेक कठीण प्रश्न बौधायनने सोडवले.