Get it on Google Play
Download on the App Store

विवाह संस्कार

हिंदू धर्मामध्ये परिवार निर्माणाची योग्यता अंगी आल्यावर, मानसिक परिपक्वता आल्यावर युवक युवतींचा विवाह संस्कार करण्यात येतो. भारतीय संस्कृतीनुसार विवाह म्हणजे काही केवळ शारीरिक किंवा मानसिक अनुबंधन नाहीये, तर इथे दाम्पत्याला एक श्रेष्ठ अध्यात्मिक साधनेचे स्वरूप दिलेले आहे. म्हणूनच म्हटलेले आहे - ‘धन्यो गृहस्थाश्रमः’

सद्गृहस्थच समाजाला अनुकूल व्यवस्था, आणि विकासात सहाय्यक होण्या सोबतच श्रेष्ठ नवीन पिढी बनवण्याचे देखील कार्य करतात. तेच आपल्या साधनांनी ब्रम्हचर्य, वानप्रस्थ आणि संन्यासी आश्रमाच्या साधकांना वंचित सहयोग देत राहतात. असे सद्गृहस्थ तयार होण्यासाठी विवाहाला रूढी आणि वाईट चालीरिती यांच्यापासून मुक्त करून एका श्रेष्ठ संस्काराच्या स्वरुपात पुनः प्रतिष्ठित करणे आवश्यक आहे. युग निर्माणाच्या अंतर्गत विवाह संस्काराचे पारिवारिक आणि सामुहिक प्रयोग सफल आणि उपयुक्त सिद्ध झाले आहेत.