मुंडन/चूडाकर्म संस्कार (जावळ)
या संस्कारात बाळाचे केस पहिल्यांदाच कापण्यात येतात. प्रचलित रूढी अशी आहे की हा संस्कार बाळ १ वर्षाचे होईपर्यंत करण्यात यावा किंवा मग थेट तिसऱ्या वर्षात करावा. हा समारंभ अशासाठी महत्त्वाचा आहे की बाळाच्या मेंदूचा विकार आणि सुरक्षा यांच्यावर यावेळी विशेष विचार केला जातो आणि हा कार्यक्रम शिशु पोषणात संमिलीत केला जातो, ज्यामुळे त्याचा मानसिक विकास योग्य रीतीने चालू होईल. चौर्याऐंशी लक्ष योनीतून भ्रमण करत राहिल्याने मनुष्य कित्येक असे पाशवी संस्कार आणि विचार आपल्या अंतरात ग्रहण करून असतो, जे मानवी जीवनात निरुपयोगी आणि लांच्छनास्पद असतात. त्यांना घालवून आणि त्यांच्या जागी मानवतावादी आदर्शांची प्रतिष्ठापना करण्यासाठी केले जाणारे कार्य एवढे महान आणि आवश्यक आहे की जर ते होऊ शकले नाही तर असेच म्हणावे लागेल की शरीर तर मनुष्याचे आहे, मात्र प्रवृत्ती तर पशुचीच बनून राहिली आहे. आपली परंपरा हेच शिकवते की केसांमध्ये स्मृती सुरक्षित राहतात, आणि जन्मतः आलेल्या केसंसोबत असलेल्या पूर्व जन्मातील स्मृती पुसून टाकण्यासाठी हा संस्कार करण्यात येतो.