Android app on Google Play

 

जातकर्म

 

नवजात बालकाची नाळ कापण्यापूर्वी हा संस्कार करण्याची प्रथा आहे. या दैवी जगताशी प्रत्यक्ष संपर्कात येणाऱ्या बालकाला मेधा, बल आणि दीर्घायू यांसाठी सुवर्ण खंडाने मध आणि तूप गुरुमंत्राच्या उच्चारांसोबत चाटवण्यात येते. दोन थेंब तुपाचे आणि सहा थेंब मधाचे मिश्रण करून अभिमंत्रित करून चाटवल्याच्या नंतर पिता बालकाच्या बुद्धिमान, बलवान, निरोगी आणि दीर्घायुषी होण्यासाठी प्रार्थना करतो. यानंतर माता बाळाला स्तनपान करवते.