Get it on Google Play
Download on the App Store

नामकरण संस्कार (बारसे)

बाळाच्या जन्मानंतर होणारा पहिला संस्कार म्हणजे नामकरण विधी असे म्हणता येऊ शकते. खरे म्हणजे जन्मानंतर लगेचच जातकर्म संस्कार करण्याचे विधान आहे, परंतु वर्तमान परिस्थितीत ते व्यवहारात आणलेले दिसत नाही. आपल्या पद्धतीत त्याचे तत्व देखील नामकरण विधीत समाविष्ट केलेले आहे. या संस्काराच्या माध्यमातून शिशु रुपात अवतरलेल्या जीवात्म्याला कल्याणकारी यज्ञाच्या वातावरणाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतो. त्या जीवाजवळ पूर्वीच्या संस्कार संचायापैकी जे हीन आहेत, त्यांच्यापासून मुक्त करणे आणि जे श्रेष्ठ आहेत त्यांचे आभार मानाने अभिष्ट असते. नामकरण संस्काराच्या वेळी बालकाच्या अंतरात मौलिक कल्याणकारी प्रवृत्ती आणि आकांक्षा यांची स्थापना, जागरणाच्या सूत्रांचा विचार करत त्यांच्या अनुरूप असे वातावरण तयार झाले पाहिजे. बालक मुलगा आहे की मुलगी, या भेदभावाला तिथे जागा असता कामा नये. भारतीय संस्कृतीत कोठेही अशा प्रकारचा भेद नाहीये. शीलवती कन्येला दहा पुत्रांच्या समान मानले गेले आहे. ‘दश पुत्र-समा कन्या यस्य शीलवती सुता.' याच्या विरुद्ध पुत्र देखील कुल धर्म नष्ट करणारा असू शकतो. ‘जिमि कपूत के ऊपजे कुल सद्धर्म नसाहि.’

त्यामुळेच मुलगा किंवा मुलगी कोणीही असो, त्याच्या अंतरातील वाईट संस्कारांचे निवारण करून श्रेष्ठत्वाच्या दिशेला त्याचा प्रवाह निर्माण करण्याच्या दृष्टीने नामकरण संस्कार केला गेला पाहिजे. हा संस्कार केला जात असताना बाळाचे आप्त, हितचिंतक आणि उपस्थित व्यक्ती यांच्या मनात बाळाला जन्म देण्या व्यतिरिक्त त्यांना श्रेष्ठ व्यक्तित्व संपन्न बनवण्यासाठीचे महत्त्व निर्माण होते. भाव भरलेल्या वातावरणात प्राप्त सूत्र कार्यान्वित करण्याचा उत्साह जागतो. सामान्यतः हा संस्कार जन्मापासून दहाव्या दिवशी केला जातो. त्याच दिवशी सुवेराचे निवारण आणि शुद्धीकरण देखील केले जाते. जर प्रसूती घरातच झाली असेल तर त्या कक्षाला झाडून, धुवून-पुसून स्वच्छ केले पाहिजे. बाळ आणि त्याची माता दोघांनाही स्नान करवून स्वच्छ वस्त्र घातली जातात. या सर्वासोबातच यज्ञ आणि संस्काराचा क्रम वातावरणात दिव्यता मिसळून अभिष्ट उद्देशाची पूर्तता करतो. जर काही कारणामुळे दहाव्या दिवशी नामकरण संस्कार करता आला नाही, तर नंतर एखाद्या दिवशी हा संस्कार संपन्न केला पाहिजे. घर, प्रज्ञा संस्थाने अथवा यज्ञ स्थळे या ठिकाणी देखील हा संस्कार करून घेणे योग्य आहे.