निष्क्रमण
निष्क्रमण याचा अर्थ आहे बाहेर काढणे. या संस्कारात बाळाला सूर्य तसेच चंद्राची ज्योती दाखवण्याची प्रथा आहे. भगवान भास्कराचे तेज आणि चंद्राची शीतलता यांच्याशी बाळाची ओळख करून देणे हाच यामागचा उद्देश आहे. यामागे बाळाला तेजस्वी आणि विनम्र बनवण्याची रचनाकर्त्यांची कल्पना असावी. त्या दिवशी देवी-देवतांचे दर्शन आणि त्यांच्याकडून बाळाच्या दीर्घ आणि यशस्वी जीवनासाठी आशीर्वाद ग्रहण केला जातो. जन्माच्या चौथ्या महिन्यात हा संस्कार करण्याची प्रथा आहे. पहिल्या तीन महिन्यांपर्यंत बाळाचे शरीर बाह्य वातावरण, कडक ऊन, वारा इत्यादींसाठी अनुकूल नसते, त्यामुळे पहिले तीन महिने काळजीपूर्वक त्याला घरातच ठेवले पाहिजे. त्यानंतर हळूहळू त्याला बाह्य वातावरणाच्या संपर्कात आणले पाहिजे. या संस्काराचा हेतू हाच की बालक समाजाच्या संपर्कात येऊन त्याला सामाजिक परिस्थितीचे ज्ञान होईल.