पेत्रा
पेत्रा जॉर्डनच्या म'आन प्रांतातील एक ऐतिहासिक नागरी आहे जी आपल्या खडकातून कोरलेल्या इमारती आणि पाणी वाहन प्रणालीसाठी प्रसिद्ध आहे. इ.स.पू. सहाव्या शतकात नाबाती लोकांनी या शहराला आपल्या राजधानीच्या स्वरुपात स्थापन केले होते. मानले जाते की या शहराची निर्मिती इ.स.पू. १२०० च्या आसपास सुरु झाली असावी. आधुनिक जगात हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पेत्रा एका "होर" नावाच्या पर्वताच्या उतारावर वसलेले आहे आणि पर्वतांनी वेढलेल्या एका द्रोणात स्थित आहे. हा पर्वत मृत सागरापासून अकाबा च्या खाडीपर्यंत जाणाऱ्या "वादी अरबा" नावाच्या घाटीच्या पूर्व सीमेला आहे. पेत्राला युनेस्कोने विश्वाचा वारसा असल्याचा दर्जा दिलेला आहे. बीबीसीने आपल्या "मृत्युपूर्वी नक्की पहावीत अशी ४० स्थाने" च्या यादीत पेत्राला देखील समाविष्ट केलेले आहे.