Android app on Google Play

 

चीनची विशाल भिंत

 

http://premieregroup.co.ke/wp-content/uploads/2014/07/the_great_wall-of-china.jpg

चीनची ही महाकाय भिंत माती आणि दगड यांच्यापासून बनलेली एक बुरुजवजा भिंत आहे. ही भिंत चीनच्या विविध शासकांनी उत्तरेकडील हल्लेखोरांपासून सुरक्षाकवच या स्वरुपात इ.स.पू. ५ वे शतक ते सोळाव्या शतकापर्यंत बांधली होती. या भिंतीच्या विशालतेचा अंदाज यावरूनच येतो की मानवनिर्मित ही कृती अंतराळातून देखील दिसते. ही भिंत ६,४०० किलोमीटर (१०,००० ली, चीनी लांबी मापन एकक) एवढ्या क्षेत्रात पसरलेली आहे. तिचा विस्तार पूर्वेला शानहाइगुआन पासून पश्चिमेला लोप नूर पर्यंत आहे आणि एकूण लांबी साधारण ६,७०० किलोमीटर (४१६० मैल) इतकी आहे. अर्थात पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अलीकडच्या सर्वेक्षणानुसार समग्र महान भिंत आपल्या सर्व शाखांसहित ८,८५१.८ किलोमीटर (५,५००.३ मैल) एवढी आहे. आपल्या उत्कर्षासाठी मिंग वंशाच्या सुरक्षेसाठी दहा लाखांहून अधिक लोक नियुक्त होते. अनुमान आहे की या महान निर्मितीच्या योजनेला जवळ जवळ २० ते ३० लाख लोकांनी आपले जीवन बहाल केले.
चीन मध्ये राज्याचे रक्षण करण्यासाठी भिंत बांधण्याची सुरुवात झाली इ.स.पू. ८ व्या शतकात ज्या वेळी कुईयान आणि जाहो राज्यांनी तीर आणि तलवारींच्या आक्रमणांपासून वाचण्यासाठी माती आणि खडे साच्यात बसवून बनवलेल्या विटांनी भिंत तयार केली. इ.स.पू. २२१ व्या वर्षी चीन किन साम्राज्याच्या अंतर्गत आले. या साम्राज्याने सर्व छोट्या छोट्या राज्यांना एकत्र करून अखंड चीनची रचना केली. किन साम्राज्याच्या शासकांनी पूर्वेला बनलेल्या वेगवेगळ्या भिंतींना एक केले आणि ती चीनची उत्तर सीमा बनली. पाचव्या शताब्दीच्या खूप नंतरपर्यंत असंख्य भिंती बांधल्या गेल्या, ज्यांना मिळून चीनची भिंत म्हटले गेले. प्रसिद्ध भिंतींपैकी एक इ.स.पू. २२० - २०६ मध्ये चीन चा प्रथम सम्राट किन शी हुआंग याने बांधून घेतली होती. त्या भिंतीचे आता केवळ काही अवशेषच बाकी आहेत. ही भिंत मिंग वंशाद्वारे बनवलेल्या सध्याच्या भिंतीपासून दूर उत्तरेला होती. नवीन चीनची खूप मोठी सीमा आक्रमणकर्त्यांसाठी खुली होती म्हणून शासकांनी भिंतीला बाकी सीमांपर्यंत पसरवण्यास सुरुवात केली. या कार्यासाठी अथक परिश्रम आणि साधनांची आवश्यकता होती. भिंत बांधण्यासाठी लागणारी सामग्री सीमेपर्यंत वाहून नेणे हे अतिशय अवघड काम होते म्हणून मजुरांनी स्थानिक साधनांचा वापर करताना पर्वतांच्या जवळचे दगड आणि मैदानांच्या जवळची माती आणि खडे यांची भिंत बांधली. कालांतराने विभिन्न साम्राज्य जशी हान, सुई, उत्तरी यांनी भिंतीची वेळोवेळी डागडुजी केली आणि आवश्यकतेनुसार भिंत विभिन्न दिशांना पसरवली. आज या भिंतीने संपूर्ण विश्वात चीनचे नाव उंच केले आहे आणि युनेस्कोने १९८७ पासून ही भिंत जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे.