Android app on Google Play

 

माचू पिच्चू

 

http://images.nationalgeographic.com/wpf/media-live/photos/000/924/overrides/machu-picchu-urubamba-river_92484_600x450.jpg

माचू पिच्चू दक्षिण अमेरिकी देश पेरू मध्ये स्थित एक कोलंबस - पूर्व युग, इंका संस्कृतीशी संबंधित ऐतिहासिक स्थान आहे. समुद्रसपाटीपासून २,४३० मीटर उंचावर, उरुबाम्बा घाटी, जिथून उरुबाम्बा नदी वाहते, त्याच्या वर डोंगरावर हे स्थळ वसलेले आहे. हे कुज्को पासून ८० किलोमीटर (५० मैल) वायव्येला स्थित आहे. याला नेहमी "इंका लोकांचे हरवलेले शहर" असे देखील म्हटले जाते. माचू पिच्चू इंका साम्राज्याच्या सर्वांत परिचित प्रतीकांपैकी एक आहे. ७ जुलै २००७ ला घोषित झालेल्या जगाच्या सात आश्चर्यांपैकी माचू पिच्चू देखील एक आहे.
इ.स. १४३० च्या आसपास इंका लोकांनी त्याचा वापर आपल्या शासकांचे आधिकारिक स्थळ म्हणून सुरु केला होता,, परंतु त्यानंतर साधारण १०० वर्षांनी, इंका लोकांवर स्पेन वाल्यांनी विजय संपादन केल्यावर या जागेला तसेच सोडून देण्यात आले. स्थानिक लोक या जागेला आधीपासूनच ओळखत होते, परंतु संपूर्ण जगाला या जागेचा परिचय करून देण्याचे श्रेय हीरम बिंघम यांना जाते, ते एक अमेरिकन इतिहासकार होते आणि त्यांनी या जागेचा शोध १९११ मध्ये लावला होता, तेव्हापासून मचू पिच्चू एक महत्वपूर्ण पर्यटन स्थळ बनले आहे.
मचू पिच्चूला १९८१ मध्ये पेरूचे ऐतिहासिक देवालय म्हणून घोषित करण्यात आले आणि १९८३ साली याला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून दर्जा दिला. स्पेनिश लोकांनी इंका लोकांवर विजय प्राप्त केल्यावर देखील या स्थळाला लुटले नव्हते, त्यामुळे एक सांस्कृतिक स्थळ म्हणून या स्थानाचे विशेष महत्व आहे आणि या स्थानाला एक पवित्र स्थान देखील मानले जाते.