Android app on Google Play

 

ताजमहाल

 

http://www.tajmahal.org.uk/gifs/taj-mahal.jpeg

ताजमहाल हा भारतातील आग्रा शहरातील एक मकबरा आहे. असे म्हणतात की त्याची निर्मिती मोघल सम्राट शाहजहान याने आपली पत्नी मुमताज महल हिच्या आठवणीत केली होती. ताजमहाल मोघल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्याची वास्तू शैली फारसी, तुर्की, भारतीय आणि इस्लामी वास्तुकलेचे उत्तम मिश्रण आहे. १९८३ मध्ये ताजमहाल युनेस्को विश्व वारसा स्थळ बनले. त्यासोबतच त्याला विश्वाच्या वारशाची सर्वत्र प्रशंसा होणारी, अत्युत्तम मानवी कृतींपैकी एक मानले गेले. ताजमहाल भारताच्या इस्लामी कलेचे रत्न म्हणून देखील घोषित करण्यात्त आले. सामान्यतः दिसणाऱ्या संगमरवराच्या फरशांच्या मोठ्या स्तरांनी झाकून बनलेल्या इमारतीन्सारखी न बनून, याचा श्वेत घुमट आणि फारशा देखील आकाराने संगमरवराने झाकलेल्या आहेत. मध्यभागी असलेला मकबरा आपली वास्तू श्रेष्ठता आणि सौंदर्याचा परिचय देते. ताजमहाल इमारत समूहाच्या संरचनेची खास गोष्ट अशी की तो पूर्णतः सममितीय (isometric) आहे. त्याची निर्मिती सन १६४८ च्या दरम्याने पूर्ण झाली होती. उस्ताद अहमद लाहोरी याला या कलाकृतीचे प्रमुख श्रेय जाते.