Android app on Google Play

 

कोलोसियम

 

https://santitafarella.files.wordpress.com/2008/08/colosseum-held-45000.jpg

कोलोसियम किंवा कोलिसियम इटली देशाच्या रोम शहराच्या मध्यात असलेले रोमन साम्राज्याचे सर्वांत विशाल एलिप्टिकल एम्फीथिएटर आहे. रोमन स्थापत्यशास्त्र आणि अभियांत्रिकीचा हा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. याची निर्मिती तत्कालीन रोमन शासक वेस्पियान याने इ.स.७० ते इ.स.७२ च्या मध्ये सुरु केली आणि इ.स.८० मध्ये सम्राट टायटसने पूर्ण केली. ८१ आणि ९६ वर्षामध्ये डोमिशियन च्या राज्यात याच्यात काही परिवर्तन करण्यात आले. या भावनाचे नाव हे एम्फीथियेटरम् फ्लेवियम, वेस्पियन आणि टाइटसचे पारिवारिक नाव फ्लेवियस मुळे आहे.


अंडाकृती कोलोसियमची क्षमता ५०,००० प्रेक्षकांची होती, जी त्या काळी सामान्य गोष्ट नव्हती. या स्टेडियम मध्ये केवळ मनोरंजनासाठी योद्ध्यांमध्ये खुनी लढाया होत असत. योद्ध्यांना जनावरांशी आणि श्वापदांशी देखील लढावे लागे. ग्लेडियेटर वाघांशी लढत असत. असे अनुमान आहे की या स्टेडियम मधील अशा प्रदर्शनांमध्ये जवळ जवळ ५ लाख पशु आणि १० लाख मनुष्य मारले गेले आहेत. याच्या व्यतिरिक्त पौराणिक कथांवर आधारित नाटकांचे प्रयोग देखील या ठिकाणी होत असत. वर्षातून २ वेळा इथे कार्यक्रमांचे भव्य आयोजन होत असे आणि रोमन निवासी या खेळांना खूप पसंत करत असत. पूर्व मध्य काळात या इमारतीला सार्वजनिक प्रयोगांसाठी बंद करण्यात आले. नंतर त्याचा उपयोग निवास, कार्यशाळा, धार्मिक कार्य, किल्ला आणि तीर्थ स्थळ अशा स्वरुपात होत राहिला.
आज एकविसाव्या शतकात भूकंप आणि दगड चोरी यांच्यामुळे ही इमारत केवळ खंडर स्वरुपात राहिली आहे. परंतु हे खंडर देखील पर्यटकांसाठी सजवून ठेवण्यात आले आहे. युनेस्को द्वारे या इमारतीचा समावेश विश्वाचा वारसा या स्वरुपात करण्यात आला आहे. आजही हे शक्तिशाली रोमन साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक आहे, पर्यटकांचे सर्वांत आवडते स्थळ आहे आणि रोमन चर्चशी निकटचा संबंध ठेवते कारण आजही गुड फ्रायडेला पोप इथून मशाल मोर्चा काढतात.