कुठे आहेत ते ?
सेटी प्रोजेक्टने आतापर्यंत परग्रही जीवनाचा कोणताही संकेत पकडलेला नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांना आता फ्रैंक ड्रेक च्या बुद्धिमान परग्रही संस्कृती समीकरणाचे कारक पुर्वानुमानांवर पुनर्विचार करण्याची आवश्यकता भासली. नुकत्याच प्राप्त झालेल्या नवीन वैज्ञानिक माहितीनुसार बुद्धिमान परग्रही संस्कृतीच्या शक्यता, १९६० मध्ये फ्रांक ड्रेक द्वारे गणना केलेल्या शक्यातेपेक्षा फार वेगळी आहे. बुद्धिमान परग्रही जीवनाची नवीन संभावना मूळ साम्भावानेपेक्षा अधिक आशावादी आणि निराशावादी दोन्ही आहे.