यूएफओ
काही कल्पना जसे की परग्रही उडती तबकडी, परग्रही द्वारा अपहरण झाल्याचे प्रकार बहुतेक शास्त्रज्ञांनी संशयास्पद मानले आहेत. उडती तबकडी किंवा UFO(Unidentified Flying Object) म्हणजे आकाशात दिसणारी एक अशी असामान्य वस्तू आहे जिला निरीक्षक किंवा संशोधक कोणत्याही ज्ञात असलेल्या विमान, वस्तू किंवा प्राकृतिक घटनेशी जुळवून पाहू शकलेले नाहीत. सर्वसामान्यपणे याला परग्रही यान समजले जाते परंतु वैज्ञानिक ही कल्पना स्वीकारत नाहीत. इतिहासात देखील उडत्या तबकड्या दिसल्याची नोंद आहे. परंतु आधुनिक काळात या गोष्टीकडे विशेष लक्ष तेव्हा देण्यात आले जेव्हा द्वितीय विश्व युद्धानंतर जेव्हा वेगवेगळ्या देशांच्या सरकारांनी या घटनांचा सैन्य दृष्टीकोनातून तपास करण्याचे आदेश दिले. अर्थात आतापर्यंत बहुतांश उडत्या तबकड्यांच्या घटना एक तर पृथ्वीचे यान किंवा ज्ञात भौगोलिक पिंड किंवा अफवा निघाल्या आहेत.