स्टेनली मीलर आणि हैराल्ड उरे द्वारा अरण्यात आलेला प्रयोग
१९५३ मध्ये स्टेनली मीलर आणि हैराल्ड उरे यांनी केलेल्या प्रयोगाने हे सिद्ध केले की जीवन निर्माण हे कार्बनिक रसायनाचे प्राकृतिक उत्पादन आहे. त्यांनी अमोनिया, मिथेन आणि काही अन्य रसायने (जू पृथ्वीच्या प्रारंभिक अवस्थेत होती) यांचेह मिश्रण एका फ्लास्क मध्ये घेतले आणि त्यातून विद्युत प्रवाह प्रवाहित केला आणि प्रतीक्षा करत राहिले. एका आठवड्यातच त्यांनी फ्लास्क मध्ये अमिनो आम्ल (Amoni Acid) निर्माण होताना पहिले. विद्युत प्रवाह मिथेन आणि कार्बन यांच्या बांधाला तोडून त्यांना अमिनो अम्लात बदलण्यास सक्षम होता. अमिनो आम्ल हे प्रोटीन चे प्राथमिक रूप आहे. या नंतर अमिनो आम्ल हे उल्कांमध्ये आणि गहन अंतराळातील ढगांमध्ये देखील मिळालेले आहे.
जीवनाचा मुलभूत आधार आहे स्वतःची प्रतिकृती तयार करणारे अणू , ज्यांना आपण DNA असे म्हणतो. रसायन विज्ञानात अशा प्रकारे स्वतःची प्रतिकृती बनवणारे अणू दुर्मिळ आहेत. पृथ्वीवर पहिला DNA अणू निर्माण होण्यासाठी करोडो वर्ष लागली. शक्यता आहे की हे अणू खोल समुद्रात निर्माण झाले. जर कोणी मिलर-उरे यांच्या प्रयोगाला करोडो वर्ष समुद्र तळात चालू ठेवले तर DNA चे अनु नक्कीच बनू लागतील. प्रथम DNA अणूंची निर्मिती ही समुद्र तळात ज्वालामुखी उद्रेकाच्या दरम्याने झाली असावी कारण ज्वालामुखी उद्रेकाच्या प्रक्रिया DNA च्या अणूंची निर्मिती होण्यासाठी आवश्यक असलेली उर्जा निर्माण करण्यात सक्षम आहेत. ही गोष्ट अजूनही समजलेली नाही की DNA व्यतिरिक्त अन्य कार्बन चे कॉम्प्लेक्स अणू स्वतःची प्रतिकृती निर्माण करू शकतात की नाही, परंतु स्वतःची प्रतिकृती बनवणारे अणू हे DNA प्रमाणेच असतील.