ड्रेक चे समीकरण
जीवनासाठी मुख्यत्वे करून द्रव पाणी, हायड्रोकार्बन रसायन आणि DNA सारखे स्वतःची प्रतिकृती तयार करणारे अणू आवश्यक आहेत. या अटींचे पालन केल्यास ब्रम्हांडात जीवनाच्या शक्यतेची मोठ्या प्रमाणात गणना करता येईल. १९६१ मध्ये कर्नेल विश्व विद्यालयाचा खगोल शास्त्रज्ञ फ्रेंक ड्रेक याने सर्वप्रथम अशीच एक गणना केली होती. मंदाकिनी आकाशगंगेत १०० बिलियन तारे आहेत, ज्यापैकी आपण केवळ सूर्यासारख्या ताऱ्यांचे अनिमान लावी शकतो, त्यानंतर त्यांच्यातील ग्रह असलेल्या ताऱ्यांचे अनुमान लावू शकतो.
ड्रेक चे समीकरण अनेक शक्यता गृहीत धरून आकाशगंगेत जीवनाची शक्यता दर्शवते.
या शक्यतांमध्ये प्रमुख आहेत -
आकाशगंगेत ताऱ्यांचा जन्मदर
ग्रह असणाऱ्या ताऱ्यांचा अंश
ताऱ्यांवर जीवनाची शक्यता असलेल्या ग्रहांची संख्या
जीवन उत्पन्न करणाऱ्या वास्तविक ग्रहांचा अंश
बुद्धिमान जीवन उत्पन्न करणाऱ्या ग्रहांचा अंश
बुद्धिमान संस्कृती द्वारे संपर्क ठेवण्याची इच्छा आणि निपुणतेचा अंश
संस्कृतीचा अपेक्षित जीवनकाळ
नीट विचार केल्यावर आणि या सर्व बाबी लक्षात घेतल्यावर एक गोष्ट समजते की आपल्या आकाशगंगेतच १०० ते १०००० ग्रह असे असतील ज्यांच्यावर बुद्धिमान जीवनाची संभावना आहे. जर हे बुद्धिमान जीवन आकाश गंगेत समान स्वरुपात विखुरलेले असेल तर आपल्यापासून साधारण १०० प्रकाश वर्ष अंतरातच बुद्धिमान जीवन असलेला ग्रह असला पाहिजे. १९७४ मध्ये कार्ल सागन च्या मते आपल्या आकाश गंगेतच १० लाख संस्कृती असल्या पाहिजेत. ( ड्रेक च्या समीकरणाचा उल्लेख कार्ल सागन ने इतक्या वेळा केला आहे की हे समीकरण कार्ल सागन चे समीकरण म्हणून देखील ओळखले जाते.) या संशोधनाने सौर मालेच्या बाहेर जीवनाच्या शोधासाठी नवी उर्मी दिली आहे. पृथ्वीच्या बाहेर जीवन असण्याच्या या शक्यतेमुळे शास्त्रज्ञांनी आता या ग्रहांपासून उत्सर्जित होणाऱ्या रेडियो संकेतांकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. कदाचित या बुद्धिमान संस्कृती देखील आपल्या प्रमाणेच टीव्ही पाहत असतील किंवा रेडियो ऐकत असतील.