रहस्यमय Wow संदेश
१५ ऑगस्ट १९७७ ला सेटी इथे काम करणाऱ्या डॉ. जेरी एह्मन यांनी ओहियो विश्व विद्यालयाच्या इयर रेडियो दुर्बिणीवर एक रहस्यमय संदेश प्राप्त केला. या संदेशाने परग्रही जीवनाशी संपर्काच्या आशेत एका नवजीवनाचा संचार केला होता.
हा संदेश ७२ सेकंदांपर्यंत प्राप्त झाला आणि त्यानंतर परत मिळाला नाही. या रहस्यमय संकेतामध्ये इंग्रजी अक्षरे आणि अंकांची एक साखळी होती जी अनियमित होती, आणि ती एखाद्या बुद्धिमान संस्कृतीकडून पाठवलेल्या संदेशाप्रमाणे होती.
डॉ एह्मन या संदेशातील परग्रही संस्कृतीच्या संदेशातील अनुमानित गुणांची समानता बघून आश्चर्य चकित झाले आणि त्यांनी कॉम्प्युटर मधून प्रिंट आउट काढताना त्याच्यावर "Wow!" असे लिहिले जे या संदेशाचे नाव बनले.
हा संदेश धनु तारामंडळ च्या जवळचा तारा समूह चाई सगीट्टारी चा तारा टाऊ सगीट्टारी इथून आला होता. यानंतर या संदेशाचा स्त्रोत शोधण्यासाठी असंख्य प्रयत्न करण्यात आले परंतु तो पुन्हा मिळाला नाही. एवढे नक्की की हा संदेश पृथ्वीवरून उत्पन्न झालेला नव्हता आणि तो अंतराळातूनच आलेला होता. परंतु काही वैज्ञानिक ज्यांनी हा संदेश वाचला होता, ते या निष्कर्षाशी सहमत नव्हते.
अमेरिकी कॉंग्रेस या प्रोजेक्टच्या महत्त्वाने प्रभावित झाली नव्हती, १९७७ मध्ये प्राप्त झालेल्या या "Wow" संदेशाने देखील नाही.