परग्रही जीवन
परग्रहावरील जीवनाबद्दल आतापर्यंत अनेक दावे करण्यात आलेले आहेत. याचा एक अप्रत्यक्ष तर्क म्हणजे आपल्याला दिसू शकणारे असीमित विशालकाय ब्रम्हांड आहे. या तर्कानुसार या असीमित विशालकाय ब्राम्हन्दाच्या बाहेर जीवन नसेल ही संकल्पना अशक्य कोटीतली आहे, या गोष्टीचे समर्थन कार्ल सागन आणि स्टीफन हॉकिंग यांच्या सारख्या शास्त्रज्ञांनी देखील केले आहे.
परग्रही जीवनाच्या शक्यता असलेल्या ग्रहांमध्ये शुक्र, मंगळ, गुरूचा उपग्रह युरोपा, शनीचा उपग्रह टायटन, एनक्लेडस आणि सौर मालेच्या बाहेरील ग्रह जसे ग्लीसे ५८१ सी, जी आणि डी समाविष्ट आहेत.