अरेसीबो संदेश
१९७१ मध्ये नासा माशे SETI संशोधनावर पैसे लावण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रस्ताव देण्यात आला. त्याला प्रोजेक्ट सायक्लोप्स नाव देण्यात आले, ज्यामध्ये १० अब्ज डॉलर गुंतवून १५०० रेडियो दुर्बिणी लावण्यात आल्या. अर्थात या शोधातूनही काहीच निष्पन्न झाले नाही यात कोणतेही आश्चर्य नाही. असे असूनही अंतराळात परग्रही संस्कृतीना संदेश पाठवणाऱ्या एका छोट्या प्रोजेक्टला मान्यता मिळाली.
हा संदेश फ्रांक ड्रेक ने कार्ल सागन आणि काही अन्य शास्त्रज्ञान्सोबत लिहिला होता. या संदेशात खालीलप्रमाणे ७ भाग होते -
१. एक (१) पासून ते दहा (१०) पर्यंतचे अंक
२. D N A तयार करणारी तत्व हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फोस्फरस चे परमाणू क्रमांक
३. डी एन ए च्या न्युक्लेटाईड चे शर्करा आणि क्षारांची रासायनिक सूत्र
४. डी एन ए च्या न्युक्लेटाईड ची संख्या आणि डी एन ए च्या संरचने चे चित्रांकन
५. मानवी शरीराच्या आकृतीचे चित्रांकन आणि मानव जनसंख्या
६. सौर मालेचे चित्रांकन
७. अरेसिबो रेडियो दुर्बिणीचे चित्रांकन आणि आकार
१९७४ साली, १६७९ बाईट आकाराच्या या संदेशाला पोर्ट रिको इथल्या महाकाय अरेसिबो रेडियो दुर्बिणीद्वारे ग्लोबुलर क्लस्टर एम 13 च्या दिशेने प्रक्षेपित करण्यात आले जो २५,१०० प्रकाशवर्ष अंतरावर आहे. हा संदेश २३ गुणिले ७३ या सरणीत होता. अंतराळ एवढे विशाल आहे की या संदेशाचे उत्तर येण्यासाठी किमान ५२,२०० वर्ष लागतील!