पज्हस्सी राजा
एक राजा जो आपल्या सहकाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी इंग्रजांशी भिडला आणि आपले राज्य, महाल आणि सत्ता यांचा देखील त्याग केला. हा असा पहिला राजा होता ज्याने इंग्रजांविरुद्ध एका नव्या युद्धनीतीचा वापर केला. पज्हस्सी राजा वायनाड च्या आदिवासींना सोबत घेऊन इंग्रजांवर तुटून पडला. कित्येक इंग्लिश अधिकाऱ्यांनी या राजाला पकडण्याचे प्रयत्न केले, पण ते सर्व अयशस्वी झाले. त्याने केवळ धनुष्य बाण घेऊन इंग्रजांशी लढाई केली.
पण त्याला त्याच्याच माणसाने धोका दिला आणि जेव्हा इंग्रज त्याला पकडायला आले, तेव्हाही तो अत्यंत शौर्याने लढत राहिला, पण पराभव जसा जवळ आला, तसा इंग्रजांच्या हातात सापडण्या ऐवजी त्याने आत्महत्या करून मरण जवळ केले. त्याचा अंत्यविधी अत्यंत सन्मानपूर्वक करण्यात आला.