Android app on Google Play

 

चन्द्रगुप्त मौर्य

 चन्द्रगुप्त मौर्य याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात भारताच्या तत्कालीन कार्यप्रणालीला विरोध करून केली. त्याचे सर्वात पहिले मोठे यश म्हणजे इसवी सन पूर्व ३१७ मध्ये ग्रीक सेनेला पंजाब मधून हुसकून लावणे. त्या घटनेपासून पुढची १२ वर्ष तो भारताच्या खूप मोठ्या हिश्शाचा सम्राट राहिला. त्याने आपल्या साम्राज्याच्या सीमा पर्शिया पर्यंत पोचवल्या. त्याला भारताचा सर्वात लायक आणि योग्य राजा मानले जाते. चंद्रगुप्त अशा राजांपैकी एक आहे ज्यांनी भारताचे भविष्यच बदलून टाकले. त्याच्या अनुपस्थितीत भारत देश आलेग्झांडर च्या महत्वाकांक्षाना बळी पडला असता. भारताला आलेग्झांडरच्या आक्रमणापासून देखील केवळ चंद्रगुप्ताने वाचवले आहे. एवढ्या मोठ्या भारतावर योग्य आणि व्यवस्थित रीतीने राज्य करणे त्याला चांगले जमले होते. त्याचे प्रशासन इतके निकोप होते की त्याचे साम्राज्य कोणताही बदल न होता त्याच्या पुत्राला मिळाले. त्याच्या धोरणांमुळे राज्यामध्ये व्यापार, रस्ते आणि सिंचन या विभागात चांगली प्रगती झाली. चंद्रगुप्त ने अनेक गोष्टींमध्ये प्रभुत्व मिळवले. त्याला भारताचा पहिला ऐतिहासिक राजा मानले जाते. अशा प्रकारे चंद्रगुप्त हा एक बुद्धिमान राजा आणि भारताचा एक महान योद्धा होता.