टीपू सुल्तान उर्फ मैसोर का टाइगर
१७६६ साली, केवळ १५ वर्षांचा असताना आपल्या माता - पित्याबरोबर मालाबार च्या मोहिमेवर गेलेला असताना टिपू सुलतानला पहिल्यांदा सैनिकी कारवाईत भाग घेण्याची संधी मिळाली. या छोट्या मुलाने २००० सैनिकांच्या एका तुकडीचे नेतृत्व केले आणि मालाबारच्या राजाचा परिवार जो एका किल्ल्यात लपला होता, त्यांना ताब्यात घेतले. आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी राजाने आत्मसमर्पण केले. आणि ते बघून अन्य स्थानिक सरदारांनी देखील त्याचेच अनुकरण केले.हैदर अलीला आपल्या मुलाबद्दल एवढा अभिमान वाटला की त्याने आपल्या मुलाला ५०० सैनिकांची एक तुकडी आणि म्हैसूर च्या पाच छावण्या दिला. इथूनच सुरुवात झाली त्या मुलाच्या सर्वोत्तम कारकिर्दीची.