Get it on Google Play
Download on the App Store

बाजीराव


बाजीराव एक प्रसिद्ध सेनापती होते. मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्यात १७२० पासून ते आपल्या मृत्युपर्यंत बाजीराव मराठा पेशवा (प्रधान मंत्री) च्या रुपात कार्यरत होते. बाजीराव पेशव्यांनी ४१ लढाया केल्या आणि त्यतील एकातही त्यांनी पराभव पहिला नाही. त्यांना मराठा साम्राज्याच्या सीमा वाढवण्याचे श्रेय दिले जाते, विशेषकरून उत्तर भारतात त्यांनी मिळवलेल्या साम्राज्यामुळे त्यांच्या मृत्यू नंतर देखील त्यांचा पुत्र २० वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत परमोच्च स्थानावर पोहचू शकला. बाजीरावांना ९ मराठा पेश्व्यांपैकी सर्वांत प्रभावी मानले जाते. असे म्हटले जाते की ते "हिंदू पद पादशाही" (हिंदू राज्य) च्या स्थापनेसाठी देखील लढले होते. एका मराठी चित्पावन ब्राम्हण कुटुंबात, छत्रपती शाहू महाराजांचे पहिले पेशवा बालाजी विश्वनाथ यांच्या मुलाच्या रुपात बाजीरावांचा जन्म झाला. जेव्हा ते २० वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या वडिलांच्या मृत्युनंतर शाहू महाराजांनी, बाकी अनेक जुने जाणते आणि अनुभवी लोक बाजूला सारून बाजीरावांना पेशवा म्हणून नियुक्त केले. त्यांच्या या नियुक्तीवरून हे लक्षात येते की शाहू महाराजांना त्यांच्यातील सुप्त गुणांची पारख त्यांच्या किशोर वयातच झाली होती. म्हणूनच त्यांनी इतर लोकांना बाजूला सारून बाजीरावांना पेशवा बनवले. आपल्या सैन्यामध्ये बाजीराव अत्यंत लोकप्रिय होते, आणि आजही त्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. बाजीरावांचा मृत्यू २८ एप्रिल १७४९ ला फार कमी वयात झाला. आपल्या जहागीरीची पाहणी करत असताना, कदाचित उष्णतेमुळे असेल, त्यांना अचानक ताप आला. आणि केवळ ३९ वर्षांचे असताना त्यांचा मृत्यू झाला. ते १,००,००० सैन्यासह दिल्लीला जात होते आणि इंदोर शहराजवळ खर्गोने प्रांतात थांबले होते. २८ एप्रिल १७४० रोजी रावेरखेडी इथे नर्मदा नदी सनावद खर्गोने जवळ त्यांचे अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सिंदिया ने एका स्मारकाची स्थापना केली. त्यांचे निवासस्थान आणि एका शंकराच्या मंदिराचे अवशेष जवळच उपस्थित आहेत.