Android app on Google Play

 

अशोक

 


सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्य चा नातू होता. तो नेहमी युद्धात स्वतः भाग घेत असे. तो स्वतः एक महान योद्धा होता. अर्थात पुढे त्याने हिंसेचा त्याग केला आणि बुद्ध धर्माची दीक्षा घेतली, परंतु आपल्या कारकिर्दीत त्याने जवळ जवळ संपूर्ण भारतावर राज्य केले. आताच्या बिहार येथील मगध इथून राज्यकारभार पाहताना त्याने इ. स. पू. २७३ ते इ. स. पू. २३२ पर्यंत राज्य केले.
भारताच्या इतिहासात अशोकला चक्रवर्ती सम्राट असे म्हटले जाते. याचा अर्थ आहे " राजांचा राजा अशोक ". त्याच्या महानतेला भारताच्या चिन्हाच्या स्वरुपात अजरामर करण्यात आले आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या मधोमध असलेले निळ्या रंगाचे चक्र हे अशोक चक्र आहे - धर्माच्या चक्राचे प्रतीक. भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोकाच्या सिंह राजाधानीवरून प्रेरित आहे.
भारतात अनेक राजानी राज्य केले, परंतु युद्धनीती बद्दल बोलायचे झाल्यास, सम्राट अशोकला भारताचा आलेग्झांडर म्हणता येईल.