Android app on Google Play

 

लान्गुल नरसिम्हा देवा

 


१२०० च्या शतकात भारत अडचणीत होता. मुसलमानी सेनांनी आपल्यावर आक्रमण केले होते. मामलुक साम्राज्याने दिल्लीतील मंदिरे नष्ट करून त्या जागी मशीद आणि कुतुब मिनार बांधले होते. अशातच तुगन खान नावाच्या एका सेनापतीने पूर्वेला कूच केले. तुगन खानच्या सेनेने राजधानी जजन्गढ पर्यंत मुलुख काबीज केला, ज्यामुळे कलिंग च्या सेनेला माघार घ्यावी लागली. राणी माता संभ्रमात पडल्या कारण त्या शेवटचे गंगादर्शन करू शकणार नव्हत्या. त्यांनी नरसिम्हा देवा यांच्याकडून वचन घेतले की ते या मुसलमानांना धडा शिकवतील. तुगन खानाने आपला दूत नरसिम्हा देवाकडे पाठवला. त्याने आदेश दिला की नरसिम्हा देवानी पुरी आपल्याकडे सोपवावे, इस्लाम धर्म स्वीकारावा आणि जगन्नाथ मंदिराची मशीद करावी. नार्सिम्ह्देव काबुल झाले, पण त्यांच्या मनात काही वेगळेच शिजत होते.
ठरलेल्या तारखेला राजाने पुरीतून सर्व दर्शनार्थी आणि जनतेला सुरक्षित जागी पाठवून त्याजागी सैनिक नेमले. तुगन खान आपल्या सेनेसोबत त्या दिवशी पुरीला आला. पुरीच्या लहान रस्त्यांवरून एवढ्या मोठ्या सैन्याला जाणे शक्य होत नव्हते, त्यामुळे तुगन खानाच्या सैन्याला विभाजित व्हावे लागले. त्यांना छोट्या छोट्या गटांनी त्या रस्त्यांवरून जावे लागले. जशी पूर्ण सेना शहरात पोचली, मंदिराच्या घंटेने इशारा केला. हा इशारा लपून बसलेल्या कलिंग सेनेसाठी होता, जे ताबडतोब तुगन च्या सैन्यावर तुटून पडले. पुरीचे रस्ते रक्ताने माखले आणि रात्री उशिरापर्यंत तिथे मुसलमानांच्या किंकाळ्या भरून राहिल्या. नार्सिम्ह्देवने धोक्याची नीती अवलंबून मुसलमानांना त्यांच्याच हत्याराने धूळ चारली. त्यांनी तुगन खानाच्या सैन्याला बंगाल पर्यंत हुसकून लावले आणि आपल्या मातेला दिलेले वचन पूर्ण केले. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी नार्सिम्ह्देवने कोणार्क येथे सूर्य मंदिर बांधले.