Android app on Google Play

 

सूरजमल

 जयपूरचे महाराज राजा जय सिंह यांच्या मृत्युनंतर त्यांचे दोन्ही पुत्र ईश्वरी सिंह आणि माधो सिंह यांच्या गादीसाठी युद्ध सुरु झाले. माधो सिंहाने मेवाड चे राजा, हाडोतीचे हाडा राजपूत आणि मराठा पेशवा यांच्याकडे मदत मागितली. मराठ्यांनी ईश्वरी सिंह याला सल्ला दिला की त्याने ४ जिल्हे माधो सिंह याला द्यावेत. कारण ईश्वरी सिंह वडीलबंधू असल्याने सत्तेवर त्याचा हक्क जास्त होता. जेव्हा राजपूत आणि मराठ्यांनी जयपूरवर हल्ला चढवण्याची तयारी केली तेव्हा ईश्वरी सिंहने आपले पिता जय सिंह यांचे मित्र सुरजमल सिंह यांच्याकडे मदत मागितली.
आपल्या विरुद्ध ७ राजांच्या सेना उभ्या ठाकलेल्या असताना देखील या २ राजांनी कच खाल्ली नाही आणि इतक्या शौर्याने युद्ध लढले की पराभवाला आपल्या विजयात रुपांतरीत केले. सुरजमल यांनी स्वतः देखील ५० हून जास्त शत्रूंना कंठस्नान घातले, आणि १५० पेक्षा जास्त शत्रूंना जखमी केले.
त्यांना भरतपूर इथल्या लोहगड किल्ल्याची निर्मिती करण्याचे श्रेय देखील दिले जाते.
संपूर्ण भारतात या किल्ल्यासारखा दुसरा किल्ला नाही. आपल्या नावाप्रमाणेच असलेल्या या किल्ल्याला भेदणे अशक्य आहे. इंग्रजांनी या किल्ल्यावर ५ वेळा स्वारी केली, परंतु पाचही वेळा ते अयशस्वी ठरले. डीग चा जल महाल देखील सुरजमल यांचीच देणगी आहे.
एक दूरदर्शी नेता, एक महान योद्धा, एक महान मुत्सद्दी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक महान व्यक्ती इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेली आहे.