केवळ स्तुती ऐकणे
रावणाचा दुसरा मोठा दुर्गुण म्हणजे त्याला आपली निंदा सहन व्हायची नाही. आपल्याकडून चूक झाली असेल, तरी देखील त्याला दुसऱ्यांकडून आपली स्तुतीच ऐकायला हवी असे. ज्यांनी कोणी त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून दिली, त्या सर्वाना त्याने आपल्यापासून दूर केले, जसे भाऊ बिभीषण, नाना माल्यवंत, मंत्री शुक इत्यादी. तो नेहमीच लाळघोट्यांनी घेरलेला राहायचा.